महावितरण विभागाकडून जोडणीचे काम शिल्लक आहे.
खेड, चिपळूणचे काम आता सुरू झाले आहे. येत्या गणपती उत्सवात किंवा दिवाळीत या ई- बसेस रत्नागिरी शहर, जिल्ह्यात धावणार आहेत. शहराबरोबच ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी एसटी जीवनवाहिनी मानले जाते. महायुती सरकारकडून महिलांना, क्योवृद्धांना विविध योजनांमध्ये सवलत दिल्यामुळे मागील तीन वर्षात सर्वसामान्य प्रवाशांचा एसटीमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस बाइत आहे. सर्वसामान्य ) प्रवाशांचा प्रवास चांगला व सुखकर व्हावा यासाठी एसटी महामंडळ चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करीत असते. काहीच महिन्यापूर्वी रत्नागिरीसह राज्यभरातील आगारात नवीन अत्याधुनिक बसेस देण्यात आल्या. सर्व ठिकाणी प्रवाशांनी या लाल परीचे जल्लोषात स्वागत केले. वाढत्या डिझेलच्या किमंतीमुळे एसटी महामंडळाच्या वतीने आता ई-बसेस घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे इंधनची बचत, लाखोंचा खर्च कमी होईल तसेच प्रदूषणही कमी होईल. यासाठी महामंडळ प्रयत्न करीत आहे. प्रदूषण विरहीत १५२ ई-बसेस रत्नागिरी जिल्ह्यात येणार आहेत.
पहिल्या टप्प्यात ३० हून अधिक बसेस मंजूर झाल्या असून लवकरच येणार असल्याचे सांगण्यात आले. रत्नागिरी, दापोली येथे चार्जिंग स्टेशनचे काम जवळपास झाले आहे. उर्वरित खेड, चिपळूणचे कामास प्रारंभझाले आहे. या चारी चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यात या ई बसेस दाखल होतील. महाराष्ट्रात पुणे, मुंबईसह अन्य ठिकाणी नवीन ई-बसेस रस्त्यावर धावत आहेत. तसेच लांबच्या पल्ल्यासाठी ई-शिवाई बसेस सोलापूर, कोल्हापूर, पुणे येथे धावत आहेत. हैद्रबाद, छत्तीसगढ, मध्यप्रदेश या ठिकाणी ही ओलेक्ट्रासह इतर कंपन्याच्या नवीन बसेस दाखल झाल्या असून रस्त्यावर धावत आहेत.