रत्नागिरी :
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील तीन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि ५० ते ६० कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे किनारपट्टीवर मच्छीमारांसाठी दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
मंगळवारी अरबी समुद्रात कर्नाटक राज्याच्या
किनारपट्टीनजीक हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे याचे कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर झाल्याने कोकण किनारपट्टीत पावसाची तीव्रता वाढली आहे. मंगळवारी सायंकाळनंतर रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला.
बुधवारी सकाळीही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. दिवसभर पावसाळी वातावरण होते. सायंकाळीही पावसाने जोरदार हजेरी लावली.