आटपाडी शहराचे मध्यवर्ती ठिकाण असणारे बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते.बसस्थानकामध्ये बस येण्याच्या व जाण्याच्या दोन्ही बाजूस टपरी, वडापावचे गाडे यांनी कोंडी केली होती.याशिवाय बसस्थानकच्या प्रवेशद्वारासमोर हॉटेल, बेकरी, पाणीपट्टी व इतर दुकानाच्या समोर लावलेली वाहने यामुळे सतत वाहतूक कोंडी होत होती.याचा त्रास अवजड वाहनांसह प्रवाशी वाहने, दुचाकी, शाळकरी मुलांना होत होता.त्यामुळे या परिसरातील अतिक्रमणे काढण्यात आली तसेच उर्वरित अतिक्रमणे हटवावी व पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी नगर पंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाने या कडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
Post a Comment
0 Comments* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.