![]() |
सांगली लोकसभा मतदार संघातून काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्यासह पाच नावे प्रस्तावित |
सांगली लोकसभा मतदार संघातून काँग्रेसकडून लढू इच्छिणाऱ्या पाच नावांची यादी प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यासह आणखी चार नावांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या चार नावांचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेत्यांसोबतच्या चर्चेनंतर होईल.
या बैठकीत जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, आमदार विश्वजित कदम यांच्यासह इतर नेत्यांनी सहभाग घेतला.
आमदार विक्रम सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, "काँग्रेसकडून जो उमेदवार दिला जाईल, त्याचे ताकदीने काम करू. गेल्यावेळी कमी मते मिळाली, मात्र खांद्यावर हात टाकण्याचा पॅटर्न चालणार नाही. काँग्रेस ताकद दाखवेल."विशाल पाटील यांच्या नावावर एकमत झालेले असले तरी, इतर चार नावांचा अंतिम निर्णय अजून झालेला नाही. यामध्ये पूर्वीच्या यादीत असलेल्या माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचे नावही असण्याची शक्यता आहे.