अलका लांबा अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा, वरुण चौधरी एनएसयूआयचे अध्यक्ष

0


 आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठ्या खांदेपालट करत दोन महत्त्वाच्या पदांवर नवीन नियुक्त्या केल्या आहेत. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी काँग्रेस प्रवक्त्या अलका लांबा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या 'एनएसयूआय'च्या अध्यक्षपदी वरुण चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.

यापूर्वी महिला काँग्रेसची जबाबदारी नेट्टा डिसुझा यांच्याकडे होती आणि 'एनएसयूआय'ची जबाबदारी नीरज कुंदन यांच्याकडे होती.अलका लांबा दिल्ली विधानसभेत आमदार होत्या. त्यांचे काँग्रेस पक्षात मोठे वजन आहे. त्यांनी अनेक वर्षे काँग्रेस पक्षासाठी काम केले आहे.

वरुण चौधरी हे उत्तर प्रदेशातील कानपूर विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. ते एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविणारे सर्वात तरुण नेते आहेत.या नियुक्त्यांमुळे काँग्रेस पक्षाला नवी ताकद मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top