![]() |
प्रारूप मतदार यादीतून मतदारांची नावे वगळली |
मतदार यादी निरीक्षक तथा पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी १८ ते १९ वर्षे या वयोगटातील मतदानासाठी पात्र झालेल्या युवकांची मतदार नोंदणी करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विशेष कार्यक्रम घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मतदार यादीत नावे जोडणे, नाव कमी करणे व त्यामध्ये सुधारणा करताना पारदर्शीपणे काम करण्यासाठी सूचना त्यांनी दिल्या होत्या. परंतु या कामात प्रसारमाध्यमे आणि राजकीय पक्षांचा सक्रिय सहभाग असावा असे त्यांनी सूचित केले होते. तसेच युथ आयकॉन यांचे विविध कार्यक्रम महाविद्यालयांमध्ये घ्यावेत,या सूचना राव यांनी दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी मतदार नोंदणीबाबत मोहीम राबवण्यात आली आहे.
विभागीय आयुक्तांच्या सूचना :- प्रारुप मतदार यादी प्रसिध्दीपूर्वी राजकीय पक्षांसोबत समन्वय साधून त्यांच्या सूचना, आक्षेप विचारात घेण्यात आले. मतदार यादीमध्ये नावे जोडणे, कमी करणे व सुधारणा न करताना पारदर्शकता व निष्पक्षपणे काम करणे, कोणत्याही यंत्रणेविरुद्ध तक्रार येवू नये याची काळजी घेण्याची सूचना मतदार यादी निरीक्षक तथा पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली होती. त्यानुसार यंत्रणेने काम केले.