न्यूयॉर्कमध्ये इच्छामरण विधेयक मंजूर; लाइलाज आजाराने पीडितांना मिळणार जीवन संपवण्याची कायदेशीर मुभा

0

न्यूयॉर्क, 9 जून 2025:

न्यूयॉर्क राज्य विधानसभेने ऐतिहासिक निर्णय घेत 'राइट टू डाई' (इच्छामरण) विधेयक मंजूर केले आहे. या नव्या कायद्याअंतर्गत लाइलाज आणि जीवघेण्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना, विशिष्ट अटींच्या अधीन राहून, औषधांच्या सहाय्याने आपले जीवन संपवण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

या विधेयकानुसार, अशा रुग्णांना दोन डॉक्टरांची वैद्यकीय मान्यता आवश्यक असेल. त्याशिवाय, रुग्णाला स्वतः लेखी अर्ज करावा लागेल आणि त्यावर दोन साक्षीदारांची सह्याही असतील. यासाठी एक महत्त्वाची अट म्हणजे डॉक्टरांनी संबंधित रुग्णाला सहा महिन्यांपेक्षा कमी आयुष्य शिल्लक आहे, असे प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे.

हे विधेयक मंजूर होण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. सर्वप्रथम 2016 मध्ये हे विधेयक विधानसभेत सादर करण्यात आले होते; मात्र आजवर ते मंजुरीसाठी प्रलंबित होते. अखेर 9 जून 2025 रोजी विधेयकाला मंजुरी मिळाली असून आता ते राज्याच्या गव्हर्नर कैथी होचुल यांच्या अंतिम स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आले आहे.

तथापि, या निर्णयाला विरोधाचाही सामना करावा लागत आहे. रिपब्लिकन नेते जॉर्ज बोर्रेलो यांनी या कायद्याला विरोध करताना म्हटले आहे की, "हे आत्महत्येला कायदेशीर मान्यता देण्यासारखे आहे. त्याऐवजी मृत्यूपूर्व काळात रुग्णांना उत्तम काळजी व उपचार मिळाले पाहिजेत."

न्यूयॉर्क राज्यात यापूर्वी यासारखा कायदा अस्तित्वात नव्हता. आता हा कायदा मंजूर झाल्यास इच्छामरणाचा कायदेशीर मार्ग उपलब्ध होणार असून, यावर संपूर्ण अमेरिकेच्या स्तरावर चर्चा सुरु झाली आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top