 |
विटामध्ये विकसित भारत संकल्प यात्रा |
नागरिकांमध्ये योजनांबद्दल जागरूकता व्हावी, लोकांनी त्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा, यासाठी भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, विटा शहरामध्ये ह्या मोहिमेच्याअंतर्गत गुरुवारी दिनांक ४ जानेवारी रोजी दाखल होणार आहे,अशी माहिती येथील मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील ह्यांनी दिली आहे,विटा शहरामध्ये गुरुवारी यात्रा होणार आहे, ह्या उपक्रमाअंतर्गत नगरपालिका खुले नाट्यगृह येथे सकाळी ९ ते १ या वेळेत आणि नगरपरिषद शाळा क्रमांक १३,शाहू नगर,विटा येथे दुपा ३ ते ७ या वेळा ठरून शिबिराचे आयोजन करण्यात आले. आहे. याठिकाणी प्रधान मंत्री स्यानिधी योजना, प्रधानमंत्री ली आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, या आयुष्यमान भारत योजना अंतर्गत आभा/गोल्डन कार्ड काढणे, आधार कार्ड आद्यावातिकरण, उज्ज्वला योजना आणि अजून काही योजनांची ह्याची माहिती व त्याचा लाभ पुरेपूर घ्यावा व शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शहरातील जास्तीत-जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी केले आहे.या मोहिमेत प्रशासक डॉ. विक्रम बांदल यांनी नागरिकांना विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेमध्ये सहभागी होऊन विटा शहरांमधील ही मोहिम यशस्वी करण्याकरता सहभागी होण्याचे आवाहन शहरात करण्यात आले.