लोकसभा निवडुकीत काँग्रेसची जोरदार तयारी....

0

 

लोकसभा निवडुकीत काँग्रेसची जोरदार तयारी

येणारी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह सर्वच पक्ष आतापासून कामाला लागलेली दिसून येतात,ज्यामधे काँग्रेस ने जोमाने तयारी केलेली असल्याचे दिसून येत आहे,देश भरातील ९ राज्यातील काँग्रेस इतर पक्षासह आघाडीवर आहेत.एकीकडे, इंडिया आघाडीत जागावाटपाची फॉर्म्युलाही ठरल्याचे सांगण्यात येत आहे,याबाबतचा अहवाल हा बुधवारी होणाऱ्या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे.तसेच सत्ताधारी भाजपतर्फे अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर टप्याटप्प्याने उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे. दुसरीकडे, काँग्रेसने इंडिया आघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित केला आहे. 

काँग्रेस ९ राज्यांमध्ये इतर पक्षांसोबत आघाडी करणार आहे. पंजाबमध्ये मात्र पक्ष स्वबळावर लढेल. या राज्यात इतर पक्षांसोबत आघाडीची शक्यता कमीच अशी माहिती मिळाली आहे, काँग्रेस हे इतर पक्षांसमवेत युती करेल अशा काही राज्यांमध्ये जम्मू-काश्मीर, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, केरळ आणि तामिळनाडूचा समावेश आहे. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षार काँग्रेसची आघाडी शक्य आहे. पंजाबमध्ये मात्र तन घडण्याची शक्यता नसल्यात जमा आहे.वाय. एस शर्मिला यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर तेलंगणा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यताही वर्तविल जात आहे. वाय. एस. शर्मिला दिल्लीत तशी घोषणा करतील, असेही सांगण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top