ऊस तोडणी, वाहतूक आणि कमिशन दरवाढची मागणी

0


 तासगाव : तासगाव येथे स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेने एक बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील ऊसतोड मजुरांना ३४ टक्के दरवाढ, तर मुकादमाना १ टक्का दरवाढ देण्यात आली आहे. मात्र, वाढत्या महागाईमुळे ऊस वाहतूकदारांना सध्याच्या दरामुळे साखर कारखान्यांना ऊस पाठविणे अर्थिक अडचणीचे बनले आहे. त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील ऊस वाहतूकदारांना ५५ टक्के वाहतूक व कमिशन दरवाढ पंधरा दिवसात करावी, अन्यथा महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील ऊस वाहतूकदार यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष संदीप राजोबा यांनी सांगितले की, "राज्यातील ऊसतोड मजुरांना ३४ टक्के दरवाढ केल्यामुळे प्रतिटन ३६६ रुपये झाले आहेत. त्याचबरोबर मुकादमास १ टक्के कमिशनमध्ये वाढ झाल्याने प्रतिटन ७३ रुपये मिळणार आहेत. असे असताना वाढती महागाई, डिझेल, वाहन दुरुस्ती, ऑईल, टायर, मजुरांना द्यावा लागणारा जास्तीचा अॅडव्हान्स व त्यावरील व्याज तसेच दुरुस्तीसाठी मिस्त्री पंक्चरवाला यांना द्यावी लागणारी मजुरी यासह इतर व्यवसायासाठी लागणाऱ्या विविध वस्तू मोठ्या प्रमाणात महागल्या असल्याने ऊस वाहतूकदार अडचणीत आले आहेत. त्यांची कर्जे सुध्दा फिटत नाहीत. त्यामुळे ऊस वाहतूकदारांना ५५ टक्के वाहतूक व कमिशन दरवाढ करणे आवश्यक आहे."

या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, याबाबत संघटना, साखर संघ व राज्य सरकार व साखर कारखानदारांच्याकडे मागणी करणार आहे. येत्या पंधरा दिवसात निर्णय न झाल्यास महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील ऊस वाहतूक स्वयंस्फूर्तीन संपावर असतील.

या बैठकीस नागेश मोहिते, विठ्ठल पाटील, विनोद पाटील, संदीप मगदूम, श्रीकृष्ण पाटील, गणेश गावडे, पी. एम. पाटील, विजय पाटील, केतन मिठारी, बालाजी पाटील, राजेंद्र भोसले, नवनाथ सूर्यवंशी, अशोक शेजाळ, विलास खराडे, पवन लोहार, नवनाथ सूर्यवंशी, नामदेव पवार, सुनील माने व ऊस वाहतूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बातमीचे मुख्य मुद्दे

राज्यातील ऊसतोड मजुरांना ३४ टक्के दरवाढ, तर मुकादमाना १ टक्का दरवाढ देण्यात आली आहे.

वाढत्या महागाईमुळे ऊस वाहतूकदारांना आर्थिक अडचणी येत आहेत.

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील ऊस वाहतूकदारांना ५५ टक्के वाहतूक व कमिशन दरवाढ करणे आवश्यक आहे.

येत्या पंधरा दिवसात निर्णय न झाल्यास महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील ऊस वाहतूक संपावर जाणार आहेत.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top