![]() |
दोन आमदारांनी केली निधीची घोषणा, प्रत्यक्षात काहीच झाले नाही |
सांगली जिल्ह्यातील दिघंची हे आटपाडी तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेले व कराड- पंढरपूर राज्यमार्गावरील प्रमुख गाव आहे. मात्र या गावाला पाच वर्षांपासून बसस्थानकच नाही. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावर उभे राहून बसची वाट पाहावी लागते.
याबाबत ग्रामस्थांनी आंदोलन केल्यानंतर लोकप्रतिनिधींकडून या प्रश्नांची दखल घेतली व आमदार अनिल बाबर यांनी १० लाख रुपये व आमदार गोपीचंद पडळकर यांनी २५ लाख रुपये देण्याची घोषणा केली. त्यावेळी आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र अद्याप बस स्थानकाच्या कामाबाबत काहीही कार्यवाही झाली नाही.
यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, आमदारांनी केलेल्या निधीच्या घोषणा केवळ खोटी आहेत. प्रत्यक्षात काहीही काम सुरू झाले नाही.ग्रामस्थांनी दोन आमदारांना पत्र लिहून बस स्थानकाच्या कामाबाबत त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.सरपंच अमोल मोरे यांनी सांगितले की, आमदार अनिल बाबर यांच्या निधीतून बस स्थानकासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच कामाला सुरुवात होईल.