![]() |
अजित पवारांनी दिली शुभेच्छा |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट) च्या पलूस तालुकाध्यक्षपदी कुंडलचे सारंग माने यांची निवड झाली. देवगिरी शासकीय निवासस्थानी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि सांगली जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड झाली.
अजित पवार यांनी सारंग माने यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, पक्षासाठी सध्या प्रतिकूल परिस्थितीचा काळ आहे. अशा परिस्थितीत माने यांनी नव्या जोमाने पक्षसंघटना मजबूत करावी. मी लवकरच पलूस तालुक्यास भेट देईन.
यावेळी वैभव पाटील, महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर, अदिती तटकरे तसेच सांगली जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष उपस्थित होते.