![]() |
४० व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन |
मांजर्डे: नववर्षा निमित्त सालाबादप्रमाणे राणाप्रताप क्रीडा व्यायाम संस्था यांच्या वतीने ४० व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिनकरदादा पाटील हंबीरमामा चषक आणि सुभाषराव भगवानराव पाटील यांच्या स्मरणार्थ ३५ आणि ६० किलो खुला गट अशा दोन गटात या होणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन सोमवार दिनांक १ जानेवारी रोजी जिल्हा क्रीडाधिकारी किरण बोरवडेकर, पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ, तहसीलदार रवींद्र रांजणे, गटविकास अधिकारी अविनाश मोहिते, तसेच उपसरपंच मोहन पाटील, विनायक मोहिते उद्योजक अग्रणी यांच्या समूहिक उपस्थितीत पार पडणार आहे. या स्पर्धेचे खुल्या गटातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक हे २१,०४० रु. व्दितीय १५,०४० रु. तृतीय १०,०४० रु. आणि चतुर्थ वाणिज्य वृत क्रमाकांसाठी ५०४० रु, रोख त्यासोबत आर. आर. आबा पाटील स्मृती चषक असे स्वरूप तयार करण्यात आले आहे. तसेच ३५ किलो वजनी गटातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक हे ' ११,०४० रु., व्दितीय ७०४० रु. तृतीय क्रमाक ५०४० रु., चतुर्थ क्रमाक ३०४० रु. त्यासोबत राजवीर विनायक पाटील स्मृती चषक असे पारितोषिकाचे स्वरूप असणार आहे.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मंगळवार दिनांक २ जानेवारी रोजी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील,मा. आ. सुमनताई पाटील, आ. अनिल बाबर, सुहास बाबर, अविनाश काका पाटील, रोहित पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या स्पर्धेसाठी राज्यातील जास्तीत जास्त संघांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन मांजर्डे उपसरपंच मोहन पाटील व मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाटील यांनी केले आहे. तसेच स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी स्पर्धेसाठी भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.