![]() |
जतच्या ६४ गावांचा पाण्याचा प्रश्न: मानव मित्र संघटनेचा आंदोलनचा इशारा |
नवीन वर्षाला प्रारंभ झाला तरी म्हैसाळ योजनेचे हक्काचे पाणी जत तालुक्यातील ६४ गावांना मिळाले नाही. त्यामुळे याविरोधात ८ जानेवारीपासून अंकलगी गावातील ग्रामस्थांनी आंदोलन सुरु करण्याची घोषणा चिक्कलगी भुयार मठाचे अधिपती, श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे अध्यक्ष तुकाराम बाबा महाराज यांनी केली आहे.
त्यांनी मध्यमांशी बोलताना म्हणाले की, पुढील काही दिवसामध्ये ते ६४ गावांत पाण्याच्या कलशासह जनजागृती मोहीम राबविणार आहेत. त्यानंतर पुढील टप्यात त्यांनी आंदोलनाची पुढील दिशा ठरविणार आहेत. जत तालुक्याच्या पूर्व भागातील गावांच्या पाण्यासाठी मानव मित्र संघटना तीव्र लढा उभारला उभारणार आहे.
पाण्यासाठी लढा उभा करावा लागतो हे खूप दुर्दैवी आहे. आणि त्या मध्ये जत तालुक्यात सध्या सुरू असलेले आमदार आणि खासदारांचे पाणी पूजनाचे सोहळे म्हणजे तालुक्याची चेष्टा केल्या सारखे आहे. २०१२ मध्येच जत मध्ये पाणी दाखल झाले होते परंतु ते पाणी १२ वर्षांनंतरही सर्वत्र पोहोचले नाही हे दुर्दैवी आहे. ते असेही म्हणाले की, मायथळ येथे आलेले पाणी कमी खर्चात माडग्याळ,गुड्डापूर, संख, दरीकोनूर, उमदी, दरीबडची, सोडीं येथे जाऊ शकते. ८ जानेवारीच्या अंकलगी ग्रामस्थांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा आहे. यावेळी सलीम अफराद, माणतेश स्वामी,पिंटू मोरे, रावसाहेब करजगी उपस्थित होते.