जिल्हा परिषदेकडून शिक्षकांची वैद्यकीय देयके अजूनही प्रलंबित

0


जिल्हा परिषदेकडून शिक्षकांची वैद्यकीय देयके अजूनही  प्रलंबित 

जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांची वैद्यकीय देयके जिल्हा परिषदस्तरावरून अजूनही प्रलंबित आहेत. शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक संघाच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेण्यात आली.

सांगली जिल्हा परिषदेत अंतर्गत प्राथमिक शिक्षकांची वैद्यकीय बिले जि.प. स्तरावरून प्रलंबित राहत आहेत, तसेच तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून तपासून पाठवलेली वैद्यकीय देयके जिल्हा परिषदेकडून नाकारले जात आहेत . त्यामुळे वर्ष होऊन सुद्धा संबंधित मागण्यांना मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे ही बिले तातडीने मंजूर करावीत, अशी मागणी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांच्याकडून करण्यात आली .

तसेच सप्टेंबर २०२२ मध्ये आंतरजिल्हा बदलीने हजर झालेल्या शिक्षकांनी सप्टेंबर २२ चे सांगली जिल्हा परिषदेकडील वेतन अनेकदा मागणी करून अद्यापही दिले नाही त्त्याबाबतही संबंधितांनी तात्काळ आदेश द्यावा, अशी मागणी केली.







Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top