![]() |
डास प्रतिबंधक औषध फवारणी आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी |
सांगली शहरात डास आणि मोकाट कुत्र्यांच्या त्रासामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील अनेक मोकळे प्लॉटमध्ये गवत, झाडे आणि पाण्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. डासांच्या प्रादुर्भावाने अनेक आजारांना आमंत्रण मिळत असल्याने शहरात डास प्रतिबंधक औषध फवारणी तातडीने करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरात अनेक ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना याचा त्रास होत आहे. मुलांची शाळा व क्लास सुरू असल्याने सायकलवरून जाताना कुत्री त्यांच्या मागे लागतात. त्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. महापालिकेने मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.