![]() |
पालकमंत्री सुरेश खाडे |
सिद्धेवाडी-खण फाटा या रस्त्याची वाहतुकीने दुरवस्था निर्माण झाली होती. ग्रामस्थांच्या तक्रारींनंतर ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला, परंतु पावसाळ्यात ठेकेदाराने विलंबाने रस्त्याच्या कामाची सुरुवात केली. काही दिवसांत पावसामुळे काम थांबविले, त्यानंतर ठेकेदार कामाकडे फिरकलाच नाही. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सूचना देऊनही अद्याप काम सुरुवात करेली नाही.
पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मतदारसंघात कोट्यवधीचा निधी आणल्याचा दावा केला आहे, परंतु अधिकारी आणि ठेकेदार संगनमताने निकृष्ट कामे करीत आहेत. सिद्धेवाडी-खण फाटा या रस्त्यातही ठेकेदाराची आपली मनमानी सुरू आहे. काम सुरू करण्यातही टाळाटाळ केल्याने पालकमंत्री सुरेश खाडे याच्याकडून ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.
![]() |
खासदार संजय पाटील यांचे दुर्लक्ष.. |
गावकऱ्यांचे एवढी हालत होत असतानाही खाजदार संजय पाटील यांचे कामाकडे दुर्लक्ष. आमदार आणि खासदार यांनी त्याची पाहणी केली नाही. तसेच रस्त्याचा निधी मिळूनही निधी कुठे आहे? हा प्रश्न ग्रामस्थाना पडला आहे.