अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान: सरकारचे दुर्लक्ष.....

0

पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊसामुळे जिल्ह्यातील ३२ हजार ७८२ शेतकऱ्यांच्या १६ हजार ५५९ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, डाळींब, आंबा, केळी फळपिकांसह रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीमध्ये सर्वाधिक फटका फळपिकांना बसला आहे.

जिल्ह्यात दि.२६ नोव्हेंबर ते दि.१ डिसेंबर या कालावधीत सलग जोरदार  पाऊस झाला होता. ढगाळ हवामानही असल्यामुळे द्राक्ष, डाळिंब पिकाला सर्वाधिक फटका बसला होता, काही द्राक्षांचे मणी सडल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती.

यामध्ये सांगली जिल्ह्यातील  मिरज तालुक्यात सर्वाधिक नऊ हजार ७९२ शेतकऱ्यांचे जिरायत पिकाचे ७६० हेक्टर, बागायत पिकाचे १८७ हेक्टर तसेच फळपिकांचे चार हजार ४८७ हेक्टरचे नुकसान झाले आहे. वाळवा तालुक्यातील दोन हजार २५० शेतकऱ्यांचे ८०८.९५ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, भाजीपाला, केळीच्या भागांचे नुकसान झाले. पलूस, तासगाव, कडेगाव, खानापूर आटपाडी, जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील पिकांचेही नुकसान झाले आहे.

या नुकसानीचा प्राथमिक अंदाजचा अहवाल प्रशासनाने राज्य शासनाकडे सादर केला आहे. पण, महाराष्ट्र शासनाकडून किंवा केंद्रा कडून  शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात कधी मिळणार, असा सवालही शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केली जात आहे आणि हीच जन भवन सुद्धा आहे. 

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top