![]() |
ऊसदराचा अखेर तोडगा निघाला. |
सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन येथे कारखान्यांचे सहकार्य प्रतिनिधी आणि स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह बैठक करण्यात आली. पंचेचाळीस दिवसापासून सांगली जिल्ह्यात उसाचा योग्य दर मिळावा हा विषय फारच चर्चेत येत होता,शेतकऱ्यांच्या मनाची धुसमळ अगदीच पाहून अखेर निर्णय घेण्यात आला,बुधवारच्या होणाऱ्या बैठकीत पहिली उचल 3 हजार 200 रुपये देण्याची मागणी स्वाभिमानीच्यावीने महेश खराडे, संदीप राजोबा यांनी केली. मात्र कारखान्यांच्या प्रतिनिधींनी त्याला प्रतिसाद दिला नाही. प्रशासनाच्यावतीने संघटना आणि कारखान्यांच्या प्रतिनिधींना दोन पावले मागे घेण्याची विनंती केली. मात्र दोघेही आपापल्या मतावर ठाम होते. त्यानंतर तुम्ही विचार करून सांगा', असे सांगून संघटनेचे पदाधिकारी बैठकीतून बाहेर आले. त्यानंतर प्रभारी जिल्हाधिकारी धोडमिसे, आ. लाड आणि कारखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. पुन्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले. त्यावेळी दुष्काळी भागातील कारखान्यांनी पहिली उचल विनाकपात 3 हजार 100 आणि इतर कारखान्यांनी 3 हजार 175 रुपये देण्याचा प्रस्ताव समोर आला. त्याला कारखान्यांच्या प्रतिनिधी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली. त्यामुळे दीड महिन्यापासून प्रलंबित असलेला ऊस दराचा प्रश्न शेवटी निकाल हा सकारात्मक मिळाला शासनाला दाराची कोंडी फोडण्यात यश प्राप्त झाले.