 |
कडेगाव: अखेर टेंभू योजनेचे आवर्तन सुरू |
कडेगाव, खानापूर, आटपाडी या दुष्काळी तालुक्यांतील गेल्या काही दिवसांपासून टेंभू योजनेचे आवर्तन कधी सुरू होणार याबाबत चर्चा सुरू होती. यावर्षी पाऊस कमी झाल्याने सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यात तीव्र पाणीटंचाई भासत आहे.
रब्बी पिके पाण्याअभावी कोमेजत आहेत. उसासह अन्य पिकेही देखील धोक्यात आली आहेत.त्यामुळे आवर्तन लवकरात लवकर सुरू करावे,अशी मागणी या तालुक्यांतील शेतकऱ्यांकडून होत होती.
बुधवार (दि. 27 रोजी) टेंभू सिंचन योजनेचे आवर्तन सुरू झाले. त्यामुळे आवर्तनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कडेगाव,खानापूर, आटपाडी आदी दुष्काळी तालुक्यांतील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
तसेच लवकरच हे पाणी पुढील तालुक्यात पोहचवले जाईल.