![]() |
जिल्हा नियोजन निधीचे असमान वाटप |
खासदार संजय पाटील ५.९४ कोटी
आमदार सुरेश खाडे ४.९५ कोटी
आमदार सुधीर गाडगीळ ४.९५ कोटी
आमदार गोपीचंद पडळकर ३.९६ कोटी
खासदार धैर्यशील माने ९.९० कोटी
आमदार अनिल बाबर ९.९० कोटी
आमदार जयंत पाटील २.११ कोटी
आमदार विश्वजित कदम २.११ कोटी
आमदार मानसिंगराव नाईक २.११ कोटी
आमदार विक्रमसिंह सावंत २.११ कोटी
आमदार सुमनताई पाटील २.११ कोटी
आमदार अरुण लाड १.७२ कोटी
आमदार जयंत आसगावकर ९२ लाख
पालकमंत्री आणि सत्तेत असणारे आमदार जिल्हा नियोजनच्या निधीवर सर्वाधिक हक्क मागताना दिसून येत आहेत त्यानुसार खाडे यांनी जिल्ह्यात जनसुविधांवर ३२ कोटी ५६ लाख, तीर्थक्षेत्र विकास योजनेसाठी सात कोटी ६३ लाख, जिल्हा मार्ग रस्त्यांसाठी ३० कोटी ४९ ग्रामीण रस्त्यांसाठी २९ कोटी ३२ लाख रुपयांची कामे करण्याचे नियोजन केले आहे. या निधीचे आमदारांना वाटप करताना पालकमंत्री यांच्यासाठी ५३ कोटी २१ लाख रुपये म्हणजे निधीवाटपंचे २० टक्के निधी घेतला आहे. भाजपच्या खासदार आणि आमदारासाठी १० कोटी ८१ लाख रुपये म्हणजे ३० टक्के निधी दिले आहे. तसेच आमदार म्हणून सुरेश खाडे यांना वेगळा ४ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. तसेच खासदार आणि उर्वरित भाजपच्या दोन आमदारांना निधीचे वाटप केले गेले आहे.
१९ कोटी ८१ लाख रुपयांचा असा निधी शिवसेना शिंदे गटाचे खानापुर विधानसभा आमदार अनिल बाबर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांना एकूण निधीच्या ३० टक्के मिळाला आहे. तर महाविकास आघाडीचे जिल्ह्यात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रा. जयंत आसगावकर, डॉ. विश्वजित कदम, आ. सुमनताई पाटील, अरुण लाड, विक्रमसिंह सावंत या सात आमदारांना जिल्हा नियोजनमधून फक्त २० टक्के म्हणजे १३ कोटी २१ लाख रुपयांचा निधी दिला गेला आहे. या जिल्हा नियोजनच्या निधी वाटपात केलेल्या मोठी विषमतेमुळे झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.