![]() |
रखडलेली कामे हीच आमदार ,खासदारांचे इलेक्शन टार्गेट |
महानगरपालिका क्षेत्रात खासदार संजयकाका पाटील, मिरजेचे आमदार व पालकमंत्री डॉ. खाडे, आणि सांगलीचे आ. सुधीर गाडगीळ हे येतात. या सर्वांनीच महापालिकेच्या कारभारामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली आहे शिवाय मनपा क्षेत्रातील अनेक प्रलंबित कामे आहेत. यामुळे विविध प्रलंबित कामांसाठी बैठका घेऊन आम्ही सर्व प्रश्न सोडवतो असे दाखवण्यासाठी सर्वच राजकीय नेत्यांची चढावोढ सुरू आहे .
इतकी वर्षे कामे खोळंबून ठेवायची आणि निवडणुका आल्या की रखडलेल्या कामांचा सपाटा लावायचा असा सुर जिल्ह्यातील नेत्यानी पकडला आहे व जनतेची दिशाभूल करायचे काम नेत्यांकडून चालू आहे . यातून एवढेच स्पष्ट होते की रखडलेली कामे हेच जिल्ह्यातील आमदार ,खासदारांचे इलेक्शन टार्गेट आहे .