![]() |
आटपाटीत शहरातील वाहतुकीला बेलगाम |
आटपाडी पोलिस वाहतूक शाखेमध्ये फक्त तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या वाहतूक शाखेबाबत आणि त्यातील कर्मचाऱ्यांच्या कारभाराबद्दल जिल्हा पोलिस प्रमुखाकडे तक्रारी केल्या होत्या.
या तक्रारीमुळे पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांचा कार्यभार काढून घेतला. वाहतूक नियंत्रण नसल्याने अण्णा भाऊ साठे चौक, बसस्थानक, बाजार पटांगण, आबा नगर चौक या भागामध्ये वाहतुकीची कोंडी होऊन परिसरातील वाहतुकीला बेलगाम घालायला कोण नसल्यामुळे मोटारसायकलवाल्याचे सुळसुळाट झाला आहे. तसेच बेकायदेशीररित्या विद्यालय आणि महाविद्यालयाच्या परिसरामध्ये प्रमाणात मोठ्या दुचाकीस्वारांची रहदळ सुरू होताना दिसत आहे. तरी या तीन कर्मचाऱ्यांची वाहतूक शाखामध्ये नियुक्ती करायला हवी. जेणेकरून हे वाहतुकीची समस्या कमी होईल.