![]() |
सांगली लोकसभा टिकीटासाठी भाजपकडे योग्य चेहरा नाही ? |
२०२४ च्या लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यावर येऊन पोहोचल्या आहेत.देशात निवडणुकीचे वातावरण तयार होताना दिसत आहे. असे असताना मात्र सांगली लोकसभा जागेसाठी भाजपला योग्य चेहरा सापडत नसल्याचे दिसत आहे.
संजय पाटील हे दोन वेळा सांगलीचे खासदार म्हणून निवडून आले. यावेळी मात्र संजय पाटील याच्याविरोधात जनतेमध्ये रोष आहे. संजय पाटील कामे करण्यात आणि आपल्या मतदारसंघात भेटी देण्यास कमी पडले असल्याचे दिसून येत आहे. अशावेळी संजय पाटील यांना उमेदवारी देणे भाजपला सोयीचे नाही. याचबरोबर संजय पाटील यांच्या नावाला पक्षांतर्गत विरोध होत असल्याच्याही चर्चा आहेत.
अशावेळी जर दूसरा चेहरा द्यायचा असेल तर त्यासाठीही भाजपकडे योग्य उमेदवार नसल्याचे दिसून येत आहे. पृथ्वीराज देशमुख वगळता इतर कोणी चेहरा नाही. पृथ्वीराज देशमुख यांचा म्हणावं तितका प्रभाव मतदारसंघात दिसून येत नाही.त्यामुळे त्त्यांनाही डावलले जाण्याची शक्यता आहे. चंद्रहार पाटील यांना भाजप उमेदवारी देणार अशी बातमी पसरली आहे. परंतु चंद्रहार पाटील यांचे नाव मध्ये येत असल्याने संजय पाटील व भाजप पक्षश्रेष्ठी यांच्यामध्ये वाद, अशी माहीती सूत्रांनी दिली आहे.
एकंदरीत भाजपकडे सांगली मतदारसंघासाठी योग्य चेहराच नाही. यामुळे लोकसभा निवडणुक सुरू होण्याआधीच भाजप बॅकफुटवर जाताना दिसत आहे.
कॉँग्रेस कडून उमेदवारी जाहीर.
कॉँग्रेस मात्र यावेळी फ्रंटफुटवर दिसून आली आहे. सांगली जागेवर विशाल पाटील हे कॉँग्रेसकडून लढतील असे नुकतेच पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले. कॉंग्रेसचा हा आत्मविश्वास हवेतला नाही. विशाल पाटील हे मतदार संघात लोकप्रिय आहेत. त्यांचा मतदार संघात प्रभाव असून ते नेहमी मतदार संघात दौरा करताना दिसून येतात. आणि कॉँग्रेस चा उमेदवार तगडा असल्याचे मत अनेक तज्ञानी याआधी व्यक्त केले आहे. त्यामुळे यावेळी कॉंग्रेस एकहाती सांगलीची जागा घेईल अशी देखिल शक्यता वर्तवली जात आहे.