लोकसभा विधासभाच्या निवडणुकीचा जुगाड

0

 

लोकसभा विधासभाच्या निवडणुकीचा जुगाड

लोकसभेची निवडणूक जवळ आली आहे. या निवडणुकीसाठी सगळे खासदार आणि आमदार हे तयारीला लगेले आहेत. खासदार संजय पाटील यांनी जत विधानसभा मतदार संघात पूर्ण ताकद लावून नवीन चमत्कार घडवून आणून आणि विलासराव जगताप यांच्या तीव्र टीकेला सामोरे जात खासदार पाटील यांनी माडग्याळ येथे जलपूजनानिमित्त सर्व राजकीय मंडळींना एकत्र आणले. यात लोकसभेच्या निवडणुकीच्या हालचाली तर दिसल्याच, मात्र दुसरीकडे जत विधानसभेचा खेळही रंगला. यावरून नवीन वर्षात राजकीय गणिते बदलणार असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

लोकसभा निवडणुकीत जतने नेहमीच महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे संजय पाटील यांना जगतापांना विसरून चालणार नाही. तरी दुसऱ्या बाजूला तम्मनगौडा रविपाटील, प्रकाश जमदाडे, रवींद्र आरळी यांची भूमिकाही ह्या निवडणुकीमध्ये महत्त्वाची ठरणार आहे.

भाजप व काँग्रेस हे दोन्ही पक्ष परस्परविरोधी असले तरी खासदारांच्या वैयक्तिक संबंधामुळे आमदार विक्रम सावंत यांच्याशीही त्यांची चांगलीच जवळीक आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत त्यांना जतमधून धोका पत्करायचा नाही. म्हणुन सर्वपक्षियांशी जवळीक बांधण्यात खासदारांना यश मिळताना दिसतेय आहे. माडग्याळ येथे झालेल्या जलपूजनानिमित्त विलासराव जगताप यांच्या घरी खासदार संजय पाटील, गोपीचंद पडळकर, आमदार विक्रम सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी चहापानासाठी हजेरी लावलेली दिसली. त्याची संपूर्ण जत तालुक्यासह जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली. असे खासदार पाटील यांच्यामुळे घडले, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

माडग्याळच्या कार्यक्रमात 'म्हैसाळ'चे पाणी कोणी व कसे आणले, यावर भरपूर चर्चा झाली. तसेच जगताप यांनी संजय पाटील यांना विरोध करत म्हणले की ‘'काकांनी जत विधानसभेसाठी इच्छुकांना एकत्र आणले. हे तेच करू शकतात,'. त्यावरून त्यांनी स्वतः अनेक इच्छुकांना शुभेच्छा देत लक्ष वेधले.आमदार विक्रम सावंत यांना टक्कर देण्यासाठी आता कोणती रणनीती ठरणार? माजी आमदार जगताप यांनाच रिंगणात उतरवणार की नवीन उमेदवार देणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top