![]() |
मिरज सुधार समितीची नुकसान भरपाईची मागणी |
अंदाजपत्रकाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज रस्ता हा २२ मीटर रस्ता होण्यासाठी काही मिळकतधारकांना १० कोटी ६५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे आणि ती भरपाई सरकारला द्यावी लागणार आहे. त्याशिवाय हा रस्ता पूर्ण होणार नाही याची कल्पना देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका प्रशासनास आहे. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिलेल्या सूचनेनुसार प्रशासन फक्त पाट्या टाकण्याचे काम करत आहे, असा आरोप ही मिरज सुधार समितीने केला आहे.
महापालिका अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या दिशेने २२ मीटर
प्रमाणे मार्किंग कैले आहे. मात्र मिळकतधारकांच्या नुकसान आणि भरपाई बाबत कोणताच अधिकारी काही बोलताना दिसत नाहीत. हा निर्णय आचारसंहिता लागण्यापूर्वीच निर्णय व्हायला हवा. लोकसभेनंतर लगेच विधानसभा आणि महापालिकेची निवडणूक येणार आहे. ह्या रस्ताचा टेंडर कॉस्ट वाढण्याची भीती देखील आहे म्हणून ह्या नुकसान भरपाईबाबत येत्या पंधरा दिवसांत त्यावर ठोस निर्णय न घेतल्यास मिरज सुधार समिती जनलढाई उभी करेल, असा इशाराही समितीने दिला आहे.