![]() |
अंगणवाड्यांच्या चाव्या ताब्यात घेण्याचे आदेश |
मात्र डिसेंबर महिन्यांपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील २ हजार ६४७ सेविका आणि तसेच मदतनीस असे एकूण सुमारे ४ हजार ८९८ कर्मचारी संपावर गेले आहेत. याचा परिणाम अंगणवाड्या महिनाभर बंद आहेत. त्यामुळे अंगणवाडीतील ६२ हजार बालकांच्या पोषण आहारावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.तसेच गर्भवती मातांना जो आहार दिला जातो त्यावर देखील परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने लाभार्थी आहारापासून वंचित राहू नये, यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणुन अंगणवाडयाच्या चाव्या घेण्याच्या अग्रवाल यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
अंगणवाडी ही शासनाची मालमत्ता आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीच्या सहाकार्याने अंगणवाडी सेविकांकडून पंचनामा करून तातडीने किल्ल्या ताब्यात घ्याव्यात. तसेच नागरी भागात बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी स्वयंसेवक, स्थानिक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या समक्ष पंचनामे करावेत. आणि चावी देण्यास टाळाटाळ केल्यास कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना अग्रवाल यांनी दिल्या आहेत.