![]() |
लोकसभा निवडुकीत काँग्रेसची जोरदार तयारी |
काँग्रेस ९ राज्यांमध्ये इतर पक्षांसोबत आघाडी करणार आहे. पंजाबमध्ये मात्र पक्ष स्वबळावर लढेल. या राज्यात इतर पक्षांसोबत आघाडीची शक्यता कमीच अशी माहिती मिळाली आहे, काँग्रेस हे इतर पक्षांसमवेत युती करेल अशा काही राज्यांमध्ये जम्मू-काश्मीर, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, केरळ आणि तामिळनाडूचा समावेश आहे. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षार काँग्रेसची आघाडी शक्य आहे. पंजाबमध्ये मात्र तन घडण्याची शक्यता नसल्यात जमा आहे.वाय. एस शर्मिला यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर तेलंगणा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यताही वर्तविल जात आहे. वाय. एस. शर्मिला दिल्लीत तशी घोषणा करतील, असेही सांगण्यात आले आहे.