 |
महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक नळ बंद |
महापालिका क्षेत्रातील विनामूल्य पाणी वापर बंद करण्यासाठी प्रशासनाने ११५ सार्वजनिक नळ कनेक्शन बंद करण्याचा निर्णय महापालिकाने घेतला आहे. परंतु महापालिकेच्या या निर्णयास सांगली, कुपवाड आणि मिरज झोपडपट्टीधारकांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे.
सार्वजनिक नळ कनेक्शनच्या सर्वेक्षणात असे दिसून आले की सार्वजनिक नळावरील पाण्याचा गैरवापर होत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे यावर सूचना करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे आयुक्त सुनील पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले. या नळाचे पाणी हे व्यावसायासाठी, गाड्या धुण्यासाठी वापरले जात आहे. तसेच छोटे या चहाचे स्टॉल्स, हातगाडे आदी विक्रेते हे स्टॅण्ड पोस्टच्या पाण्याचा वापर करताना दिसून आले आहेत. त्यामुळे महपालिकेने प्रभाग समिती १ ते ४ मधील सर्व सार्वजनिक नळ कनेक्शन बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे त्यावरील सूचना आणि हरकती मागवून ८ जानेवारीपर्यंत मंगलधाम इमारतीत नोंदवाव्यात, असे आवाहन कार्यकारी अभियंता सी. एस. कुरणे यांनी केले आहे.
महापालिकेने ह्या आधी देखील असा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला परंतु अनेक नगरसेवकांनी त्यास विरोध दर्शविला होता. कारण त्याचा लाभ हा या प्रभागातील झोपडपट्टया आणि गोरगरिब नागरिकांना होत आहे. परंतु, आता या सर्व कारभाराच्या दोऱ्या प्रशासनाने हाती घेतल्या आहेत यामुळे त्यांनी ठामपणे हे नळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.