![]() |
कर्नाटकपूर्व भागात पाणी देण्याच्या प्रस्तावाला मंजूरी |
कर्नाटकमध्ये शिल्लक असणारे पाणी जत तालुक्याला ‘जत तुबची-बबलेश्वर योजनेतून’ देण्याच्या प्रस्तावाला आता यश आले आहे. या पाणी- मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारच्या कृष्णा खोरे पाटबंधारे विभागाने तयार केला आहे. आमदार विक्रमसिंह सावंत पत्रकार परिषदेत बोलताना असा विश्वास व्यक्त केला की कर्नाटक पूर्व भागात लवकरच पाणी येईल.
सावंत म्हणाले की, जत विधानसभा क्षेत्रातील जनतेला जे आश्वासन दिले होते त्या विविध प्रश्नांना गेल्या चार वर्षांत न्याय देता आला आहे. विशेषतः पाण्याच्या प्रश्नावर त्यांनी आजवरच्या सर्वच अधिवेशनांत सतत या भागाचा विषय सभागृहात लावून धरला असेही ते म्हणाले. याचे फळ आज मूळ म्हैसाळ योजना ही अंतिम टप्प्यात येत आहे.
२०१९ च्या निवडणुकीत जनतेनी जतच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मला विधिमंडळात पाठविले होते. आणि या काळात लोकांच्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ दिल नाही. सतत जत मधील पाण्याच्या प्रश्नावर राज्याच्या सभागृहात आवाज उठवला आहे. तसेच महाविकास आघाडीची सत्ता असताना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासनिधी आणण्यात यशही मिळवले आहे. त्यानंतर अनेकदा पाण्यासाठी विधिमंडळासमोर आंदोलनही केले. आणि सभागृहात २८ तारांकित प्रश्न उपस्थित केले.