![]() |
सांगलीत उद्या जिल्हास्तरीय कृषी महोत्सव |
सांगलीत उद्या जिल्हास्तरीय कृषी महोत्सव
सांगलीमध्ये शुक्रवार दि. २९ रोजी कृषी विभागामार्फत जिल्हास्तरीय कृषी महोत्सव आयोजित केला जाणार आहे.या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याहस्ते होणार आहे.सांगलीअशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली.
महोत्सवामध्ये तृधणान्य पिकांचे जिवंत नमुने, प्रक्रियायुक्त पदार्थ, प्रक्रियेसाठी लागणारी यंत्रसामग्री, धान्यविक्री, यांचा समावेश होणार आहे.सन २०२३ हे वर्ष जगभर मिलेट इयर म्हणून साजरे होत आहे. याअनुषंगाने तृणधान्यांचा आहारातील समावेश वाढावा तसेच तृणधान्यांच्या पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढीसाठी चालना देण्याचे काम कृषी विभागाकडून वर्षभरापासून सुरु आहे.
यानिमित्ताने जिल्ह्यात गेले वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने जनजागृती सभा, मिलेट रन, हुरडा महोत्सव, पीक प्रात्यक्षिके, तृणधान्य पिकांचे आहारातील महत्त्वत इत्यादी विषयावर कार्यशाळा, मेळावे घेण्यात आले.