कोल्हापूर येथील कार्यक्रम संपल्यानंतर सायंकाळी ते सांगलीत येणार आहेत. येथील स्टेशन चौकात महापालिकेतर्फे राजारामबापू पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. या पुतळ्याचे अनावरण त्यांच्याहस्ते होणार आहे. त्यानंतर एका रुग्णालयाचे उद्घाटनही त्यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार आहेत.
निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीची तयारी
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जिल्ह्यात शरद पवार गट व अजित पवार गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अजित पवार गटातून शहर जिल्हाध्यक्ष म्हणून प्रा. पद्माकर जगदाळे व ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून वैभव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी बैठका घेत जोरदार गटबांधणी सुरू केली आहे. विविध पक्षांतील कार्यकर्त्यांना ते आपल्या गटात घेत आहेत.
दुसरेकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनीही शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीच्या तयारीचे आदेश दिले आहेत. दोन्ही गटात पक्षबांधणीसाठी जोरदार घडामोडी सुरू आहेत.