जाणून घ्या मराठा समाजाचे नव्या पर्वाचे निकष होणार निश्चित.

0

 

जाणून घ्या मराठा समाजाचे नव्या पर्वाचे निकष होणार निश्चित. 

सांगली,ऑनलाइन वार्ता..

पूर्ण राज्यात सध्याच्या स्थितीला नव्याने निकषांत बदल करून होणाऱ्या मराठा समाजाचा समावेश हा ओबीसीमध्ये जारी केले जाणार. याबाबत असणारी बैठक राज्य मागसवर्ग आयोगाच्या वतीने बुधवारी पुणे येथे होणार आहे,ह्या बैठकीमध्ये मराठा समाजाचे मागसलेपण तपासण्यासाठी २००८ नंतर ची नक्की सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक स्थिति काय आहे,ह्याचा शोध काढून ह्या निकषा मध्ये बदल करण्याचे विचार सुरू असल्याचे चर्चा व निर्णय होण्याची शक्यता आहे.ठरवलेल्या निकषातून गुण बदलण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे

निकष व गुण

जाती/ पारंपरिक व्यवसाय/ हस्तकला कारागिरी/ रोजगारासाठी सामाजिक स्तरात कनिष्ठ - २०

  •  राज्याच्या सरासरीच्या पाच टक्क्यांपेक्षा अधिक स्त्रिया या निर्वाहाकरिता व्यवसाय/ रोजगार/ मजुरीमध्ये हलके काम - २०
  • राज्याच्या सरासरीच्या पाच टक्क्यांपेक्षा अधिक पुरुष हे निर्वाहाकरिता व्यवसाय/ रोजगार/ मोलमजुरीत हलक्या दर्जाचे काम करतात - २०

सर्वांगीण विकासाकरिता - अनुकूल सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण नाही. - १०

  •  राज्याच्या सरासरीच्या पाच टक्क्यांपेक्षा अधिक पुरुषांचा आणि दहा टक्क्यांपेक्षा अधिक स्त्रियांचा बालविवाह होतो. - १०
  • अंधश्रद्धाळू प्रथा आणि अंधविश्वास सर्रास आढळतो. - १०

स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या चालीरीती सामान्य आहेत .
एकूण गुण - १००

आर्थिक निकष व गुण
  • दारिद्रयरेषेखालील कुटुंबांचे प्रमाण राज्याच्या एकूण कुटुंबांपेक्षा २५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. - २०
  • किमान ३० टक्के लोक हे कच्च्या घरांमध्ये राहतात. कच्चे घर म्हणजे ग्रामपंचायत कायद्यानुसार कराच्या अनुषंगाने कच्चे घर म्हणून घोषित झालेले घर. - १०
  • अल्पभूधारक कुटुंबांचे प्रमाण सरासरीच्या १०% पेक्षा अधिक १०
  • भूमिहीन कुटुंबांची संख्या राज्याच्या सरासरीपेक्षा किमान १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. - १०
  •  कोणत्याही शैक्षणिक संस्था, औद्योगिक प्रतिष्ठान किंवा रोजगाराचे इतर स्रोत नाहीत. - १०
शैक्षणिक निकष व गुण
  • पहिली ते दहावीदरम्यान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. - १०
  • मुलींच्या शाळेतील गळतीचे प्रमाण पहिली ते दहावीदरम्यान राज्याच्या सरासरीच्या २० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. - २०
  • दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. - १०
  • बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. - १०
  • पदवी किंवा पदव्युत्तर किंवा तत्सम शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. - १०
  • वकिली, वैद्यकीय, अभियांत्रिकी- तंत्रज्ञान, चार्टर्ड अकाउंटंसी, मॅनेजमेंट, डॉक्टरेट अभ्यासक्रम शिकणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे प्रमाण सरासरीच्या २० टक्क्यांपेक्षा कमी आहे.- २०
एकूण गुण - ८०
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top