![]() |
नाट्य परिषदेतर्फे भरवन्यात आलेल्या संमेलनात्त विविध स्पर्धांचे आयोजन |
भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने राज्यभर शतकमहोत्सवी नाट्य संमेलनाच्यानिमित्ताने नाट्यकलेचा जागर करण्याचा मानस आहे.यामधे
बालनाट्य,एकपात्री,एकांकिका,नाट्यछटा,अभिवाचन,गायन या स्पर्धा घेन्यात येणार आहेत. या स्पर्धा तिन फेरी मधे होनार आहेत त्यात प्राथमिक फेरी उपांत्य फेरी व अंतिम फेरी आसा या फेरी चा समावेश आसेल.फक्त मराठी भाषेतच सर्व स्पर्धा होतील.
शतकमहोत्सवी नाट्य संमेलनात विजेत्या कलाकृतींचे सादरीकरण होणार आहे.नऊ दिग्गज दिग्दर्शक हे मराठी रंगभूमीवरील अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या ९ एकांकिकांना प्रत्येकी एक याप्रमाणे चार दिवस मार्गदर्शन करणार आहेत.सहभाग पत्र सर्व सहभागी कलावंतांना देण्यात येणार आहे.प्रवेश फी, स्पर्धेचे प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारली जाणार आहे.३१ डिसेंबर ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे.या तरखेला सायंकाळी प्रवेश फी, स्पर्धेचे प्रवेश अर्ज पाच वाजेपर्यंत स्वीकारली जाणार आहे.एकूण २५ लाख रुपयांची रोख पारितोषिके सर्व प्रकारच्या स्पर्धांसाठी प्राथमिक आणि अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहेत.तसेच या स्पर्धांसाठी स्मृतचिन्हे आणि प्रमाणपत्रे जाहीर करण्यात आली आहेत.जास्तीत जास्त सांगली जिल्ह्यातील कलाकारांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.