![]() |
एमआयएमची महाविकास आघाडीमध्ये सामावून घेण्याची मागणी |
महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यासह अन्य घटक पक्ष आहेत. आम्हालासुद्धा त्यांनी सोबत घेतले पाहिजे. अशी मागणी एमआयएमने केली .त्याच बरोबर प्रसारमाध्यमांमार्फत आम्ही महाविकास आघाडीला हा प्रस्ताव देतोय. महाविकास आघाडीने एमआयएमला त्चर्चेसाठी बोलवावे. अशी मागणी करण्यात आली.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी बोलणी होऊ शकते. शिवसेनेसोबत काँग्रेस- राष्ट्रवादी जाऊ शकते, तर आम्ही का नको, असा प्रश्न खा. इम्तियाज जलील यांनी बोलताना केला. महाराष्ट्रात एमआयएम महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार आहे. जर भाजपला पराभूत करायचे असेल तर आम्हाला सोबत घ्यावे लागेल. असे विधान एमआयएमने केले.