सांगलीमध्ये पाणी योजनेबाबत उद्या बैठक

0



सांगलीमध्ये पाणी योजनेबाबत उद्या बैठक

कृष्णा नदीचे वाढलेले प्रदूषण, पिण्याच्या पाण्याची टंचाई यावरील उपाययोजना म्हणून वारणा उद्भव योजना आणि चांदोली धरणातून पाणी उचलून आणणून सांगली आणि कुपवाड शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेचे बळकटी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. या दरम्यान,मदनभाऊ पाटील युवा मंचने तातडीची गरज म्हणून वारणा उद्भव योजना राबवावी, अशी मागणी केलेली आहे, तर नागरिक जागृती मंचने थेट चांदोली धरणातून पाणी आणण्याची आग्रही मागणी केली आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आयुक्त महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार सांगली व कुपवाड शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात वारणा उद्भव योजना व थेट चांदोली धरणातून पाणी उचलणे यासंदर्भात शुक्रवार, दि. २९ रोजी सकाळी ११ वाजता मंगलधाम प्रशासकीय इमारतीत बैठक बोलावली आहे. महापालिका, एमजेपी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये या दोन्ही योजनांवर चर्चा होणार आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे (एमजेपी) कार्यकारी अभियंता,पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी,पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंते उपअभियंता एमजेपी, संदीप दिवाण व एस. के. रांजणे हे सेवानिवृत्त अधिकारी, यांची उद्या बैठक बोलावली जाणार आहे. वारणा उद्भव योजना आणि चांदोली धरणातून पाणी आणणे योजना या दोन्ही योजनांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top