![]() |
सांगली-मिरज-कुपवाड: काँग्रेस चे विशाल दादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश... |
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या लोकांसाठी आरोग्याचा विषय गांभिर्यपूर्ण बनत आहे. मनपाकडून बांधण्यात येणारे पहिले वहिले हॉस्पिटल दुर्दैवाने लाल फितीच्या कारभारात अडकले आहे व त्याचा त्रास सामान्य जनतेला होतोय.
सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल दादा पाटील आणि सन्माननीय आमदार सतेज पाटील यांची काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे एका कार्यक्रमादरम्यान भेट झाली होती. त्यावेळी विशाल पाटील यांनी सांगली-मिरज-कुपवाड मधील हॉस्पिटलचा प्रश्न विधानपरिषदेत मांडण्याबद्दल विनंती केली होती.
त्यामुळे आज सन्माननीय आमदार सतेज पाटील यांनी हा मुद्दा विधानपरिषदेत उचलून धरला व संबंधित मंत्रीमहोदयांकडून समाधानकारक उत्तर मिळवले. यामुळे नजीकच्या काळात संपूर्ण निधी मिळून एक भव्य रुग्णालय सांगलीकरांच्या सेवेत असेल याची खात्री आहे.त्यामुळे सांगलीच्या जनतेच्या वतीने विशाल दादा पाटील यांनी आमदार मा. सतेज पाटील साहेबांचे आभार मानले.