![]() |
राष्ट्रवादीचे १४ माजी नगरसेवक अजित पवार गटात प्रवेश करणार |
माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी नगरसेवक विष्णू माने, भाजप नेते सुरेश आवटी आणि माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांनी अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे देखील उपस्थित होते.
बागवान यांनी भेटीनंतर सांगितले की, मिरज आणि कुपवाडमधील दर्गा आणि अन्य विकास कामांसाठी त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली. या कामांसाठी टप्प्या-टप्प्याने निधी देण्याचे आश्वासन त्यांना मिळाले आहे. पक्षप्रवेशाबाबत काहीच चर्चा झाली नाही.
माने यांनी सांगितले की, कुपवाडमध्ये भाजी मंडई, विद्या गार्डन, अहिल्यादेवी होळकर स्मारक लायब्ररी, उद्यान, डीपी रोड आणि अंतर्गत रस्ते, ओबीसी वसतिगृहासाठी त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली. या कामांसाठी निधी देण्याचे आश्वासन त्यांना मिळाले आहे. दरम्यान, पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाली नाही.
प्रा. जगदाळे यांनी सांगितले की, मिरज आणि कुपवाडमधील राष्ट्रवादीचे १४ माजी नगरसेवक अजित पवार यांचे नेतृत्व मानणारे आहेत. या १४ माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश लवकरच होईल.
भाजपचे माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांनी सांगितले की, सध्या ते भाजपमध्ये आहेत. मात्र प्रसंगी भाजपचे ९ माजी नगरसेवक राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश करतील. मिरज आणि कुपवाडमधील अनेक माजी नगरसेवक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून महापालिकेची आगामी निवडणूकही लढवतील.
राष्ट्रवादीच्या मिरज आणि कुपवाडमधील १४ माजी नगरसेवक अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. यामुळे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.