 |
विजापूर-गुहागर महामार्गाचे काम अपूर्ण |
जतमधील विजापूर-गुहागर महामार्गावरील प्रवास हा बिकट बनला आहे. तेथील धाब्याजवळच्या रखडलेल्या पुलाचे काम पूर्ण झाले परंतु त्याच्याजवळील रस्ता हा अरुंद बनल्याने वाहनाना येण्याजाण्यास अडथळे निर्माण होत आहेत. मोठ्या पुलाचे काम पूर्ण सुरू झाले, परंतु तेथील रस्ता हा अरुंद झाल्याने तेथून प्रवास करणे हे जीवघेणे ठरत आहे.त्या महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने हे काम अर्धवट सोडले आहे. जरी पुलाचे काम हे पूर्ण झाले असले तरी, त्यांच्या अपूर्ण कामामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे तेथील वाहतूक ही एकपदरी मार्गावरून सुरू आहे त्यामुळे ही वाहतूक करणे वाहनाणा अडचणीचे ठरत आहे. रस्ता अरुंद असल्यामुळे प्रामुख्याने दुचाकी वाहनधारक हे अक्षरशः जीव मुठीत घेऊन वाहन चालवताना दिसत आहेत. ह्या रस्त्याकडेला कसलीच सुरक्षा व्यवस्था नसल्याने मोठा अपघात घडला. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु वाहनांचे खूप मोठे नुकसान झाले. रस्त्याचे काम अपूर्ण का ठेवले, याचे जवाब कोणी देताना दिसत नाही.ह्या कंपनीच्या अपूर्ण बांधकामामुळे पूर्व-पश्चिम रस्ता असला तरीसुद्धा, तेथील पुलाच्या बांधकामामुळे उत्तरेस मोठा खड्डा निर्माण झाला आहे.