अंगणवाडी संपातून एका संघटनेची माघार, दुसरे संघटनेचे आंदोलन सुरू

0

 


सांगली: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सरकारकडून सहानुभूती दाखवण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) या संघटनेने बेमुदत संपातून माघार घेतली. मात्र महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ त्यांच्या मागणीवर ठाम आहे.

महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना निवेदन देऊन संपातून माघार घेतल्याची माहिती दिली. निवेदनात म्हटले आहे की, फडणवीस यांनी अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सरकारकडून सहानुभूती दाखवली आहे. ग्रॅच्युईटीच्या रकमेत वाढ करण्यासह पेन्शन याबाबत सरकारने सहमती दर्शवली आहे. त्यामुळे या संघटनेतील कर्मचारी बुधवार दि. १० पासून कामावर हजर होणार आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या राज्य उपाध्यक्षा आनंदी भोसले यांनी सांगितले की, आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नाही, सेविका, मदतनीस कामावर येणार नाहीत, अंगणवाडी सुरू करणार नाहीत.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top