![]() |
पाण्यासाठी शेतकऱ्यांचे रक्तदान आंदोलन |
अंकलगी तलावातून पूर्व भागातील तब्बल चाळीस गावांचे पिण्याच्या पाण्याचे टँकर भरले जातात. मात्र या तलावापर्यंत अद्याप म्हैसाळ योजनेचे पाणी पोहोचले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व उद्योजक विजयकुमार चिपलकट्टी यांच्या नेतृत्वाखाली २५ हून अधिक गावातील शेतकऱ्यांनी अंकलगी येथे बेमुदत उपोषण सुरू केले.
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी रक्तदान करून आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी तम्मनगौडा रवी-पाटील यांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला. खासदार संजय पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून उपोषणकर्त्यांनी चर्चा केली.