जिल्ह्यामध्ये बेरोजगारांना रोजगार मिळावा व परिसराचा विकास व्हावा या हेतूने माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी १९६० मध्ये औद्योगिक वसाहतीची स्थापना केली. त्यांनी त्यांची राजकीय ताकद वापरून या वसाहतीला जागा, वीज, पाणी, शासनाच्या विविध परवानग्या मिळवून दिल्या होत्या. काय आहे या वसाहतीची आजची स्थिती. एक वेध आजपासून, जिल्ह्यामध्ये बेरोजगारांना रोजगार मिळावा व परिसराचा विकास व्हावा या हेतूने माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी १९६० मध्ये औद्योगिक वसाहतीची स्थापना केली. त्यांनी त्यांची राजकीय ताकद वापरून या वसाहतीला जागा, वीज, पाणी, शासनाच्या विविध परवानग्या मिळवून दिल्या होत्या. काय आहे या वसाहतीची आजची स्थिती. एक वेध आजपासून...
आखीव-रेखीव अशी जिल्ह्यातील एकमेव सांगली औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीच्या माध्यमातून सुमारे ५००० लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. या वसाहतीला सध्या असलेल्या सुविधा अपुऱ्या असून शासनाने आणखी सुविधा दिल्यास ही वसाहत राज्याचा आदर्श ठरू शकते. त्यासाठी राजकीय नेत्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
वसंतदादा पाटील यांनी १९५० ते ६० च्या दरम्यान सांगली शहरात साखर कारखाना, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती व औद्योगिक वसाहत या महत्त्वाच्या तीन मोठ्या संस्था स्थापन केल्या. या संस्थांच्या रोजगार निर्मितीमुळे जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या सांगलीत बऱ्यापैकी रोजगार उपलब्ध झाला आहे. या संस्था नसत्या तर सांगली शहराला केवळ एका नागरी वसाहतीचे रूप मिळाले असते. सांगली औद्योगिक वसाहत संस्थेने स्वतःच्या भांडवलातून सांगली शहरात सुमारे ५० एकर जागा खरेदी केली आहे. यामध्ये २३६ भूखंड पाडून ते उद्योजकांना वितरित केले आहेत. १०० हून अधिक रोजगार उपलब्ध करून देणारे सुमारे २० उद्योग आहेत. या वसाहतीलगतच वसंतदादा साखर कारखाना असल्याने हा संपूर्ण परिसर औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखला जातो.
वसाहतीमध्ये अपवाद वगळता बहुसंख्य रस्ते डांबरी आहेत. आयकॅप - सुयोग पॅकवेल- आय.टी.आय. मार्गे पश्चिमेकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब आहे. या रस्त्यावरून वाहन चालविताना कसरत करावी लागते. अवजड वाहने या रस्त्यावरून जाणे अत्यंत अडचणीचे ठरते. हा रस्ता डांबरी नसल्याने रस्त्यावर पाणी साचत असते. शिवाय या सांगली अनेक ठिकणी असे अरुंद रुस्ते असून रस्त्याकडेला असा कचरा साचलेला असतो. (छाया : सचिन सुतार)
कुंपणापर्यंत डांबरी रस्ता नाही. त्यामुळे संपूर्ण रस्त्याचे रुंदीपर्यंत, डांबरीकरण झालेले नाही. वसंतदादा १ औद्योगिक वसाहत रस्त्याकडेला अनेक ठिकणी कचरा साचलेला असतो. टेलिफोन कार्यालयाच्या चौकामध्ये रस्ता खराब असून तो दुरुस्त करणे आवश्यक आहे. तसेच संपूर्ण वसाहतीमध्ये भूखंडधारकांच्या वसाहतीच्या काही भागामध्ये पथदिवे बंद असल्याने अनेकवेळा लोकांना अंधारातूनच ये-जा करावी लागते. अनेक रस्त्याच्या कडेने गटारीची सुविधा झाली नसल्याने सांडपाण्याची व्यवस्था नाही. विशेषतः आय.टी.आय. ते आयकॅप कारखाना मार्गावर वारंवार पाणी साचत असते. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. काही कारखानदारांनी त्यांच्या कारखान्यातील कामगार व...
• आयकॅप आय. टी. आय. समोरील पश्चिमेकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करावा
संपूर्ण वसाहतीमध्ये रस्त्याच्या कडेला गटारी व सांडपाणी निचरा होण्यासाठी उपाययोजना करावी