![]() |
साहेबराव पाटील अजित पवार गटात प्रवेशले, ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी निवड |
वायफळे येथील साहेबराव पाटील हे १९८० पासून आर. आर. पाटील यांचे खंदे समर्थक होते. मात्र, पक्षातील अंतर्गत कलहामुळे ते पक्षातून बाहेर पडले होते. टेंभू योजनेपासून वंचित असलेल्या तालुक्यातील २१ गावांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारे साहेबराव पाटील यांची जिल्हाध्यक्ष अॅड. वैभव पाटील यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांना उपमख्यमंत्री अजित पवार यांना ताकद देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची विनंती अॅड. पाटील यांनी केली होती. त्यावेळी साहेबराव पाटील यांनी ही विनंती तत्काळ मान्य करीत अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
साहेबराव पाटील यांच्या प्रवेशाने सांगली जिल्ह्यात अजित पवार गटाची ताकद वाढली आहे. आगामी काळात सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमय करण्यासाठी साहेबराव पाटील यांचे योगदान महत्त्वाचे असेल, असे मानले जात आहे.
यावेळी जिल्हा सरचिटणीस अविनाश चोथे, खानापूर तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, जत तालुकाध्यक्ष सुनील पवार, तासगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती दादासाहेब कांबळे, सिद्धेवाडीचे माजी सरपंच आप्पासाहेब चव्हाण, यमगरवाडीचे माजी सरपंच बाबूराव यमगर, वायफळेचे भिमराव नलवडे, सोपान मेटकरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.