जयश्री पाटील : कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक
सांगली : मी मैदानातून पळणारी महिला नाही. आपले तिकीट कोणी कापले, आपणाला पळायला लावणारे कोण, हे सारे मला माहिती आहे, असे सांगत आपणाला गाडणा-यांना गाडायचे आहे, असे जाहीर आवाहन काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील यांनी केले. सांगली विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने भावनांचा उद्रेक झालेले जयश्री पाटील यांचे समर्थक रविवारी सकाळी विष्णूअण्णा भवनमध्ये एकत्र आले होते. जयश्री पाटील यांच्यासमोर त्यांनी आपल्या संतप्त भावना रोखठोकपणे मांडल्या. बंद दरवाजा फोडायचाच, असा निर्धार केला. यावेळी अनेक कायकर्त्यांच्या भावनांचा बांध फुटला. जयश्री पाटीलही यावेळी भावनावश झाल्या. जयश्री पाटील म्हणाल्या, मदन पाटील यांच्यानंतर कोणतेही पद नसताना मी धडपडत आहेत. दादा, अण्णा आणि भाऊंप्रमाणे मी पण संकटांचा सामना केला आहे. अनेकांचे राजकारण पाहिले आहे. माझा पिंड राजकारणाचा नसतानाही कार्यकर्त्यांसाठी मी राजकारणात राहिले. यावेळीही मी खूप प्रयत्न केले. पण आपला वापर दुसऱ्याला जिंकवण्यासाठी होत असेल, तर मी तो होऊ देणार नाही.
सांगली : समर्थक कार्यकर्त्यांसमोर बोलताना जयश्री पाटील. सोबत प्रतीक पाटील, डॉ. जितेश कदम व इतर.
आज अर्ज भरणार
जयश्री पाटील आज सोमवारी काँग्रेस आणि अपक्ष असे दोन्ही अर्ज दाखल करणार आहेत. अजूनही पक्षाकडून सांगलीत एवी फॉर्म आलेला नाही. मुदतीपर्यंत इतर लोक अर्ज मागे घेतील, अशी अपेक्षा असून एबी फॉर्म जयश्री पाटील यांनाच मिळेल. आज ११ वाजता विजय बंगल्यावरून अर्ज भरण्यासाठी कार्यकर्ते जाणार असून रॅली किंवा मेळावा होणार नाही, अशी माहिती कार्यकर्त्यांनी पत्रकार बैठकीत दिली.