रत्नागिरी :
मान्सूनपूर्व पावसाने मंगळवारी जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. रत्नागिरी शहर परिसरात तर दुपारी १ वाजता पावसाने जोरदार सुरुवात केली. जिल्ह्यात सर्वत्रच हा पाऊस पडला. या पावसामुळे आंबा पिकाचे शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
गेले ४-५ दिवस जिल्ह्यात अनेक ठिकाणी तुरळक असा पाऊस पडत होता. सोमवारी सायंकाळी चिपळूण, संगमेश्वर परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. रात्री काही भागात तुरळक पाऊस पडला, मंगळवारी दुपारी १ वाजल्यापासून रत्नागिरी शहर व परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस.