रत्नागिरीला 'रेड अलर्ट' | तिसऱ्या दिवशी पावसाने जनजीवन विस्कळीत, अनेक ठिकाणी नुकसान

0

रत्नागिरी :  गेल्या तीन दिवसांपासून कोकण भागांमध्ये पाऊस सुरूच आहे, या पावसामुळे दुर्घटना घडल्या नसल्या तरी सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी साडेआठ वाजताच्या निरीक्षणानुसार दक्षिण कोकण, गोवा किनारपट्टीच्या जवळ पूर्व मध्य अरबी समुद्रात जे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, ते येत्या ३६ तासांमध्ये अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रातील संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड आणि रत्नागिरी या दोन रत्नागिरी: मिऱ्या नागपूर हायवेचा परटवणेनजीक पऱ्यावर खचलेला रस्ता जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या काळात वाऱ्याचा वेग हा ३५ ते ४० किलोमीटर प्रति तास इतका असू शकतो, तर काही ठिकाणी तो ताशी ६० किलोमीटर इतका सुद्धा असण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम होता. काही भागात पडझडीच्या घटना घडल्या आहेत. रत्नागिरीमध्ये मिऱ्या-नागपूर हायवेचे काम सुरु असून, फिनोलेक्स कॉलनीनजीक उद्यमनगर ते परटवणे दरम्यान बिबटीचा पऱ्या येथे रस्त्याचा भाग खचला आहे. त्यामुळे या मार्गावरुन वाहतूक बंद करण्यात आली आहे. जुन्या रस्त्याने तात्पुरती वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. भाट्ये मार्गावरही सुरुबनातील झाडे पडल्याने वाहतूक संथ झाली होती.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top