राजकारणाची बदनामी थांबवा | धुळे प्रकरणावर भास्करराव जाधव यांची आक्रमक भूमिका

0

धुळे येथील शासकीय विश्रामगृहात कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम सापडल्याच्या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी विधानपरिषद सभापती आणि विधानसभा अध्यक्षांना एक खरमरीत पत्र लिहून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 

जाधव यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, धुळे येथील शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मधून 1 कोटी 85 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, याहीपेक्षा अधिक रक्कम जमा करण्यात आल्याची चर्चा आहे. ही खोली विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार (शिंदे गट) अर्जुन खोतकर यांचे खासगी सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावावर बुक होती. या प्रकरणाने महाराष्ट्र विधिमंडळाच्या गौरवशाली लौकिकाला गालबोट लागले असून, संसदीय परंपरेला आणि विधिमंडळाच्या पवित्रतेला कलंक लावणारी ही घटना आहे.

या प्रकरणात भास्कर जाधव यांनी घेतलेली आक्रमक भूमिका त्यांना एक निष्ठावान आणि निर्भय लोकनेता म्हणून अधोरेखित करते. गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ विधिमंडळात कार्यरत असलेल्या जाधव यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे, “विधानसभेचे पावित्र्य आमच्यासाठी सर्वोच्च आहे. त्यासाठी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही.

धुळे प्रकरणाने निर्माण झालेल्या या गढूळ वातावरणात, भास्करराव जाधव यांचा आवाज हा स्वच्छतेची आणि पारदर्शकतेची मागणी करणारा एक महत्त्वाचा सूर बनला आहे. त्यांनी केलेली उच्चस्तरीय चौकशीची मागणी ही केवळ कागदोपत्री न राहता, तिची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा आता राज्यातील प्रत्येक नागरिक व्यक्त करत आहे. कारण, महाराष्ट्राच्या संसदीय परंपरेचा मान राखायचा असेल, तर या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे. विधिमंडळाचे पावित्र्य राखण्यासाठी आणि जनतेचा लोकशाहीवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी, या प्रकरणाचा निवाडा लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. जाधव साहेबांनी पेटवलेली ही मशाल, महाराष्ट्राच्या राजकीय शुद्धीकरणाची पहिली पायरी ठरो, अशीच भावना आज सर्वसामान्यांच्या मनात आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top