शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता मेळावा शुक्रवार, ६ जून रोजी चिपळुणमध्ये

0

चिपळूण | प्रतिनिधी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने चिपळूण तालुका कार्यकर्त्यांसाठी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा पक्षाच्या महिला आघाडी आणि युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडणार आहे.

हा मेळावा शुक्रवार, ६ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता कावीळतळी येथील लक्ष्मीबाई मारुतीराव बांदल हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यकर्ता मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून पक्षाचे सचिव आणि माजी खासदार विनायकजी राऊत, माजी मंत्री आणि गुहागरचे आमदार भास्करराव जाधव, रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सहदेवजी बेटकर, दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ताराम कदम, उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख बाळा खेडेकर, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा संपर्कप्रमुख सुरेश कदम उपस्थित राहणार आहेत.

तसेच, जिल्हा समन्वयक मंगेशराव शिंदे, रवींद्र डोळस, जिल्हा संघटक संतोष थेराडे, युवासेना कार्यकारिणी सदस्य आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांतजी जाधव, तालुका समन्वयक सुधीरभाऊ शिंदे, तालुका संघटक राजू देवळेकर, लोकसभा संघटक सौ. नेहा माने, महिला संघटक सौ. अरुणा आंब्रे, सौ. वेदा फडके, सौ. धनश्री शिंदे, सौ. ऐश्वर्या घोसाळकर, रूमा देवळेकर, सौ. मानसी भोसले, सौ. वैशाली शिंदे, युवा सेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे, तालुका अधिकारी उमेश खताते, शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, आणि युती सेना अधिकारी डॉ. सानिका टाकळे-रेडीज आदींची उपस्थिती राहणार आहे.

या मेळाव्यात चिपळूण तालुक्यातील सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, अंगीकृत संघटना, जेष्ठ शिवसैनिक, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उपजिल्हाप्रमुख श्री. प्रतापराव शिंदे आणि विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी केले आहे.


📅 दिनांक: शुक्रवार, ६ जून २०२५

🕙 वेळ : सकाळी १० वाजता

📍 ठिकाण: लक्ष्मीबाई मारुतीराव बांदल हायस्कूल, कावीळतळी, चिपळूण

🚩 शिवसेना एकजुटीसाठी सज्ज!

🚩 सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे!

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top