पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका तालुक्यातील नेर्ली आणि शाळगाव खोऱ्याला बसू लागला आहे. तसेच याचा परिणाम शेतातील बागायती आणि ऊस पिकावर देखील दिसून आला आहे. त्यामुळे टेंभू सिंचन योजनेचे आवर्तन शासनाने सुरू करावे व कडेगाव तालुक्यातील सर्व तलाव पाण्याने भरून घ्यावेत, अश्या मागणीचा जोर शेतकरी करत आहेत.
कडेगाव तालुक्यात यावर्षी जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीप्रश्न गंभीर बनत चालला आहे. शासनाने कडेगावला दुष्काळी तालुका म्हणून जाहीर केला आहे. कमी पावसामुळे तालुक्यात खरीप पिके वाया गेली आहेत. हा रब्बी हंगाम तरी शेतकऱ्यांच्या पदरी पडावा यासाठी टेंभू योजना तातडीने सुरू करणे गरजेचे आहे. अशी मागणी शेतकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.