या शिष्टमंडळामध्ये संघटनेचे राज्याचे अध्यक्ष सुभाष जिरवणकर, राज्य कोषाध्यक्ष पाकिजा पटेल, राज्य प्रवक्ता सुनील गुरव, सल्लागार परसराम हॅबाड, नागपूर जिल्हाध्यक्ष सुनील नायक संपर्क गजानन देशमुख नागपूर सरचिटणीस बळीराम चापले, सल्लागार माया गेडाम सल्लागार डॉ. शारदा रोशन खडे असे पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी अशी पदे ही सेवा ज्येष्ठतेनुसार भरावीत. राज्य निवेदनात म्हटले आहे की पदे भरताना ज्या शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे त्यांना प्राधान्य देण्यात यावे, तसेच २०१४ पासून बंद केलेल्या जिल्हा आणि राज्य पुरस्कार प्राप्त वेतनवाढ पुन्हा सुरू कराव्यात. ओळखपत्र द्यावे आणि निमंत्रण सदस्य म्हणुन शासनाच्या जिल्हा व शासकीय समितीवर निवड करावी. जुनी पेन्शन योजना लागू करावी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख उपशिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी, जागा भरताना शिक्षकांना प्राधान्य द्यावे. तसेच कमी पट असलेल्या शाळा बंद करू नयेत आणि अशैक्षणिक कामे कमी करावीत, अश्या विविध मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने दिले आहे.